Tuesday 26 November 2013

2014 या वर्षाची दिनदर्शिका पाहण्यासाठी खाली दिलेल्या महिन्यां-

 च्या नावावर क्लिक करा व त्या महिन्याची दिनदर्शिका पाहा.


Tuesday 5 November 2013


भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीया -(यमद्वितिया) दिपावली , चौथा दिवस 
हिंदुधर्मातील सण आणि उत्सव
भाऊबीज
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा 
चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या
 कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.'
 आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची
 कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-
भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना
 समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची
 जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात
 निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज
 पूजनाचा दिवस.
या दिवशी बहिणीच्या घरी भाउ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी
 चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला 
ओवाळते. भाउ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा
 सत्कार करतो.